Community Service

 

 

 

*दृष्टी नसली तरी स्वप्नांना दिशा देणारा ‘RYLA – EHSAAS’ उपक्रम उत्साहात संपन्न*

*कोल्हापूर, २९ ऑगस्ट २०२६ :*
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर, डिस्ट्रिक्ट ३१७० यांच्या संयुक्त विद्यमाने *Dnyanprabodhan Bhavan Sanchalit Andh School* मधील दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी *‘RYLA – EHSAAS – Where Hearts See Beyond Eyes’* या विशेष उपक्रमाचे आयोजन शनिवार, दि. *२९ ऑगस्ट २०२६* रोजी *रोटरी समाज सेवा केंद्र, कोल्हापूर* येथे करण्यात आले.

दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे तसेच नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात *डॉ. नरेंद्र पाटील* यांच्या Physiology व Diet विषयावरील मार्गदर्शन सत्राने झाली. विद्यार्थ्यांना आरोग्य, योग्य आहार आणि शरीराची काळजी याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली.

यानंतर *डिस्ट्रिक्ट RYLA चेअरपर्सन Rtr. गौरव जैन* यांनी 7D Effect Storytelling या विशेष सत्रातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रभावी कथाकथनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली तसेच त्यांच्या मनातील आत्मविश्वासाला नवी उभारी मिळाली.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक व ज्ञानवर्धक खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये *Quiz, Smell Test, Taste Test* यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या बुद्धिमत्तेचे, संवेदनक्षमतेचे तसेच आत्मविश्वासाचे दर्शन घडविले. याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी *गायन व कविता सादरीकरणातून आपले कलागुण* सर्वांसमोर सादर केले.
कार्यक्रमात *Rtr. Shrimanyu आणि Bhakti* यांनी सादर केलेल्या मनमोहक द्वयी गीताने उपस्थितांचे मनोरंजन

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना *पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण* करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि त्यांच्या विविध गुणांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी *रोटरी क्लबचे अध्यक्ष Rotarian Pradeep Pasmal रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष Rtr. Ranveer Jadhav, कार्यक्रमाच्या सचिव व प्रोजेक्ट चेअरपर्सन Rtr. Bhagyashree Sarda, Rotary RYLA Chairperson Rotarian Aman Momin* तसेच *Shravni, Mayank, Preeti आणि Nithal* यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनाची संधी न देता त्यांच्या *आत्मविश्वासाला, स्वावलंबनाला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन*